शिंदे यांच्या शिवसेनाला मोठा झटका, ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना दिलासा; काय आहे प्रकरण?

| Updated on: Apr 06, 2023 | 10:11 PM

VIDEO | एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा झटका, ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना ठाणे न्यायालयाकडून दिलासा

ठाणे : ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना ठाणे न्यायालयाकडून दिलासा मिळाल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट प्रकरणी रोशनी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी रोशनी शिंदे यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. याप्रकरणी ठाण्यातील कासारवडवली आणि नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांनी ठाणे न्यायालयाकडून दिलासा मिळाल्याचे समोर आले आहे. ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना काही महिलांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, या मारहाणीत रोशनी शिंदे या जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणावरुन ठाण्यातील राजकीय वातावरण तापले असून एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले होते. याप्रकरणी शिंदे आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे.

Published on: Apr 06, 2023 10:04 PM
सोलापुरातील भैरवनाथ यात्रेत अनोखी परंपरा, ऐकून व्हाल थक्क
अन् यापुढे उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर शुद्धीकरण! नवनीत राणा पुन्हा एकदा बरसल्या