Thane Loksabha Election Exit Poll 2024 : होमपीचवरच एकनाथ शिंदे यांना धक्का?; राज्यातील सर्वात मोठी बातमी

| Updated on: Jun 01, 2024 | 9:11 PM

निवडणुकीचा निकाल येत्या 4 जून रोजी लागणार आहे, मात्र त्यापूर्वीच टीव्ही 9 पोलस्ट्रॅट पिपल्स इनसाईट्सचा एक्झिट पोल समोर आला आहे. या एक्झिट पोलमध्ये धक्कादायक अंदाज समोर आला आहे. तर होमपीचवरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का बसणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे राजन विचारे आणि एकनाथ शिंदे यांचे विश्वासू नरेश म्हस्के यांच्या लढत होती.

लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या 4 जून रोजी लागणार आहे, मात्र त्यापूर्वीच टीव्ही 9 पोलस्ट्रॅट पिपल्स इनसाईट्सचा एक्झिट पोल समोर आला आहे. या एक्झिट पोलमध्ये धक्कादायक अंदाज समोर आला आहे. महायुतीला 22, महाआघाडीला 25 आणि 1 जागा अपक्ष उमेदवाराला मिळणार असं दिसत आहे. एक्झिट पोलनुसार भाजपाला 18, शिंदेच्या शिवसेनेला 4, काँग्रेसला 5, ठाकरे गटाला 14, पवार गटाला 6 जागा मिळतील. तर अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही, असे समोर आले आहे. तर होमपीचवरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का बसणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे राजन विचारे आणि एकनाथ शिंदे यांचे विश्वासू नरेश म्हस्के यांच्या लढत होती. त्यामुळे कोणचा विजय होणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, ठाकरे गटाचे राजन विचारे हे आघाडीवर आहेत तर नरेश म्हस्के हे पिछाडीवर आहे. जर असं झालं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का असणार आहे.

Published on: Jun 01, 2024 09:11 PM
Election Exit Poll 2024 : महाराष्ट्रात कोणता पक्ष सर्वात मोठा? भाजप, शिवसेना की… कोणाला सर्वाधिक जागा?
Bhiwandi Loksabha Election Exit Poll 2024 : बाळ्या मामा की कपिल पाटील?; एक्झिट पोलचा भुवया उंचावणारा अंदाज काय?