ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्के यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
कल्याणमधून महायुतीचे उमेदवार म्हणून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली, तर ठाण्यातून नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. नरेश म्हस्के यांचं नाव घोषित होताच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आभार व्यक्त केले. नरेश म्हस्के यांची पहिली प्रतिक्रिया काय?
आज शिवसेना शिंदे गटातून कल्याण आणि ठाणे मतदारसंघासाठी लोकसभा निवडणुकीचे उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले. कल्याणमधून महायुतीचे उमेदवार म्हणून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली, तर ठाण्यातून नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. नरेश म्हस्के यांचं नाव घोषित होताच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आभार व्यक्त केले. नरेश म्हस्के म्हणाले, एका कार्यकर्त्याला ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागा लढण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून देण्यात आली आहे. हे फक्त शिवसेनेतच होऊ शकतं. सर्वसामान्य कार्यकर्त्याला समाजामध्ये काम करण्याची प्रेरणा या माध्यमातून नक्कीच मिळेल. एका कार्यकर्त्याचा विजय किंवा ही संधीच दिली आहे. या संधीचं सोनं करण्याची संधीच शिवसेनेकडून देण्यात आली आहे आणि विजयाकडे वाटचाल करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, अशी प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी दिली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाण्यातून नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा करण्यात करण्यात आल्यानंतर त्यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे.