Thane MLC Election : 50 वर्षांपूर्वी ग्रॅज्यूएट झालेल्या महिलेचं पदवीधर निवडणुकीत मतदान, म्हणाल्या…

| Updated on: Jun 26, 2024 | 11:54 AM

मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ आणि नाशिक-मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक पार पडत आहे. अशातच कोकण पदवीधर मतदार संघातील निवडणुकीसाठी ठाण्यात अनेक मतदार दाखल होत आहे. याकरता ठाण्यात पन्नास वर्षांपूर्वी ग्रॅज्यूएट झालेल्या एका ज्येष्ठ महिलेने पदवीधर निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला

लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघाचा समावेश आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ आणि नाशिक-मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक पार पडत आहे. अशातच कोकण पदवीधर मतदार संघातील निवडणुकीसाठी ठाण्यात अनेक मतदार दाखल होत आहे. याकरता ठाण्यात पन्नास वर्षांपूर्वी ग्रॅज्यूएट झालेल्या एका ज्येष्ठ महिलेने पदवीधर निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्या ज्येष्ठ महिलेचे नाव सुप्रिया पेठे असे असून त्यांचे वय 76 वर्ष आहे. त्यांनी देखील पदवीधर निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत आपला मोलाचा सहभाग दर्शवला. यावेळी त्यांनी फक्त मतदान केले नाही तर तरुणांनी आमच्याकडे बघून जास्तीत जास्त मतदान करावे, असं आवाहन देखील केले. यासोबतच जास्तीत जास्त काम या कोकण विभागीय पदवीधर आमदाराने करावी अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

Published on: Jun 26, 2024 11:54 AM
खासदारकीच्या शपथेनंतर पहिल्याच दिवशी कंगना रनौत सापडल्या वादात?
Kokan MLC Election : कोकण पदवीधरसाठी 13 उमेदवार मैदानात, रमेश कीर vs निरंजन डावखरेंमध्ये लढत; मतदानासाठी गर्दी