नाले साफसफाईच्या कामांवर आता ड्रोन ठेवणार नजर, कामात कुचराई आढळल्यास कारवाई

| Updated on: Mar 31, 2023 | 12:20 PM

VIDEO | पावसाळापूर्वी ठाणे शहरातील संपूर्ण नाल्यांची साफसफाई करण्याचे ठाणे पालिका आयुक्तांनी दिले आदेश

ठाणे : पावसाळापूर्वी ठाणे शहरातील संपूर्ण नाल्यांची साफसफाई करण्याचे आदेश ठाणे पालिका आयुक्तांनी दिले आहेत. असे असताना यंदाच्या वर्षी नाले साफसफाईवर आता ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. दरवर्षी नालेसफाई ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पावसाळ्यापूर्वी केली जाते. परंतु अनेक वेळा या नालेसफाई वरती प्रश्नचिन्ह हे उद्भवले जातात. यासाठीच ठाणे महानगरपालिकेने अशा प्रकारची युक्ती लढवली असून यामध्ये ठाणे शहरातील एकूण तीनशे किलोमीटर लांबीचे नाले स्वच्छ करण्यात येणार आहेत. ठाणे शहरातील प्रमुख 12 नाल्यांसोबत 312 गटारे हे पाणी वाहून नेणारे आहेत. 31 मे च्या पूर्वी हे नालेसफाई पूर्ण कारण्याचे योजले असून नाल्याच्या कामकाजात कोणत्याही प्रकारची कुचराई आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिलेले आहेत.

Published on: Mar 31, 2023 12:20 PM
शिरसाट-अंधारे प्रकरणात सुळेंची उडी; ट्विट करत केली कारवाईची मागणी
किराडपुराचे जीवन पूर्वपदावर मात्र संभाजीनगरमधील राड्यात एकाचा मृत्यू, 14 पोलीस जखमी