Thane Corona : विनामास्क फिरणाऱ्यांवर ठाण्यात कारवाई, 500 रुपयांचा दंड
मुंबईप्रमाणेच ठाण्यातही कोरोना(Corona)ची रुग्णसंख्या वाढल्यानं महापालिका आणि पोलिसांच्या वतीनं मास्क (Mask) न घालणाऱ्या तसंच मास्क खाली असणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड आकारला जात आहे.
मुंबईप्रमाणेच ठाण्यातही कोरोना(Corona)ची रुग्णसंख्या वाढल्यानं महापालिका आणि पोलिसांच्या वतीनं मास्क (Mask) न घालणाऱ्या तसंच मास्क खाली असणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड आकारला जात आहे. मंडई, जांभळी नाका यासह विविध परिसरात ही कारवाई करण्यात येतेय. सातत्यानं वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येतंय. नागरिकांनी नियमांचं तंतोतंत पालन करावं, असं आवाहन करण्यात आलंय.