ठाणे शहर हद्दीतील चार्जिंग स्टेशनचा मार्ग अखेर मोकळा, चार्जिंग स्टेशनची संख्या वाढणार

| Updated on: Sep 06, 2023 | 2:59 PM

VIDEO | ठाणे महानगरपालिका हद्दीतील चार्जिंग स्टेशनचा मार्ग अखेर मोकळा, शहरात 100 चार्जिंग स्टेशन उभा करण्याचा महानगरपालिकेचा मानस, येत्या महिन्यात दहा चार्जिंग स्टेशन पाहायला मिळणार

ठाणे, ६ सप्टेंबर २०२३ | ठाणे महानगरपालिका हद्दीतील चार्जिंग स्टेशनचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे. ठाणे शहरात येत्या महिन्यात आपल्याला दहा चार्जिंग स्टेशन पाहायला मिळणार असून एकूण 67 स्टेशनला ही मान्यता देण्यात आलेली आहे. ठाणे शहरात 100 चार्जिंग स्टेशन उभा करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. ठाणे शहरांमध्ये वापरण्यात येणाऱ्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांना यामुळे दिलासा मिळणार आहे. ठाणे शहराची वाढती लोकसंख्या पाहता या ठिकाणी इलेक्ट्रिक वाहने खरेदी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचाच विचार करून ठाणे महानगरपालिकेने इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Published on: Sep 06, 2023 02:59 PM
‘Maratha समाजाला ओबीसींचं प्रमाणपत्र दिल्यास…’, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा राज्य सरकारला इशारा
‘केंद्र सरकारची XXX आहे, त्यामुळेच त्यांनी….’ विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली