‘… हा तर मोठा जोक!’, विजय वडेट्टीवार यांच्या शरद पवार यांच्यावरील ‘त्या’ टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्याचं प्रत्युत्तर
VIDEO | 'विजय वडेट्टीवार काय म्हणाले याच्यावरती मी स्पष्टीकरण द्यावं, हे हास्यास्पद होईल. पण शरद पवारांना कोण ऑफर देऊ शकतो हे म्हणजे या वर्षातील सर्वात मोठा जोक आहे!', विजय वडे्ट्टीवार यांच्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांचं प्रत्युत्तर
ठाणे, १६ ऑगस्ट २०२३ | काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर भाष्य केलं. शरद पवार हे सोबत आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री करू अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अट असावी. त्यामुळेच अजित पवार शरद पवार यांची भेट घेत असावेत, असं विजय वडेट्टीवार म्हणाले होते. यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘विजय वडेट्टीवार काय म्हणाले याच्यावरती मी स्पष्टीकरण द्यावं, हे हास्यास्पद होईल. पण शरद पवारांना कोण ऑफर देऊ शकतो हे म्हणजे या वर्षातील सर्वात मोठा जोक आहे!’, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत. पुढे ते असेही म्हणाले की, त्यांची उंची किती. त्यांची लोकसभेतील कारकीर्द किती आणि त्यांना कोण ऑफर देणार, जे कोणी काय बोलतात ते बोलू देत. पवार साहेबांनी सांगोल्याच्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितलं आहे की मी कुठेही जाणार नाही. मी जातीयवादी पक्षाची हात मिळवणार नाही. मी पुरोगामी विचारांचा पुरस्कार करता आहे. मी तेच विचार पुढे घेऊन जाणार आहे. तर शरद पवार हे पुरोगामी विचार घेऊनच चाललेत यापुढे पुरोगामी विचार घेऊनच चालतील, असा विश्वासही जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.