ठाण्यात दहीहंडीची जय्यत तयारी, टेंभीनाक्याच्या दहीहंडीला मुख्यमंत्री हजेरी लावणार?

| Updated on: Sep 06, 2023 | 5:17 PM

VIDEO | धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन ठेवले. उद्या मानाच्या दहिहंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लावणार हजेरी?

ठाणे, ६ सप्टेंबर २०२३ | धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन ठेवले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव त्याच जोमात साजरा होत असून आनंद दिघे यांनी सुरुवात केलेली परंपरा पुढे सुरु ठेवण्यात आली आहे. मानाची दहिहंडी यावेळी उत्साहात साजरी होणार असून यूट्यूब टिव्ही चँनलसह लोकल प्रवासात देखील प्रवाशांनाही लाईव्ह पाहता येणार आहे, अशी माहिती शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी दिली. टेंभीनाक्याची दहिहंडीपासून प्रेरणा घेऊन मुंबई ठाण्यात ठिकठिकाणी उत्सव सुरू झाले. त्यामुळे आजही मुंबई ठाण्यातील सर्व गोविंदा पथके टेंभीनाक्यावर या दिघे साहेबांच्या.. मानाच्या दहीहंडीला येऊन सलामी देतात. शिस्तबध्द नियोजन हे या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य. त्यामुळे ठाण्यातील दहीहंडीला मुख्यमंत्री हजेरी लावणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: Sep 06, 2023 05:17 PM
कोल्हापूरच्या प्रतीक पाटील याचा नादखुळा, 23 व्या वर्षी बनला कृषी विभागाचा उपसंचालक
‘केंद्र सरकारची XXX आहे, त्यामुळेच त्यांनी….’ विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली