‘कोणाचा दबाव?’, संजय राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं तर देवेंद्र फडणवीसांनी मानले आभार

| Updated on: Nov 01, 2024 | 11:07 AM

भाजपचाच मुख्यमंत्री होणार आणि महायुतीचं सरकार येणार येणार असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले. अशातच संजय राऊत यांनी कोणाचा दबाव असं म्हणत राज ठाकरेंना डिवचलं.

Follow us on

महायुतीचं सरकार येणार आणि भाजपचा मुख्यमंत्री होणार असं राज ठाकरे यांनी म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना तात्काळ आभार व्यक्त केलेत. मात्र मुख्यमंत्रीपदावरून राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यात देवेंद्र फडणवीस यांनी थोडसं करेक्शन केलंय. भाजपचा मुख्यमंत्री नाही तर महायुतीचा मुख्यमंत्री होणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ‘महाविकास आघाडीसोबत जाणार नाही. शिवसेनेत असताना माझा सर्वाधिक संबंध भाजपशीच आला. तर यंदा सरकार महायुतीचेच बनणार असून तीन महिन्यापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार येणार असं वाटत होतं. पण हरियाणाच्या निकालानंतर चित्र थोडं बदललं आहे. मात्र महायुतीला इतकं सोपही नाही. पण मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सत्तेत असेल. भाजपचा मुख्यमंत्री हा मनसेच्या साथीने होईल’, असं राज ठाकरेंनी म्हटलंय. तर राज ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे उघडपणे सांगताय निकालानंतर भाजपसोबत जाणार.. मनसेचे १०० आमदार येणार असा दावाही त्यांनी केलाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट