बजरंगबली की जय! रिमोटंनं चढवला तब्बल 350 किलोचा हार, किंमत ऐकून व्हाल थक्क
VIDEO | हनुमानाच्या 105 फूट उंच मूर्तीला तब्बल 350 किलोचा हार चढवला, कुठं आहे ही मूर्ती?
बुलढाणा : राज्यभरात आज हनुमान जयंती साजरी होत असून भाविकांमध्ये हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच बुलढाणा जिल्ह्यात आज हनुमान जयंती सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय. आज नांदुरा येथे 105 फुटी विशालकाय हनुमान मूर्तीवर रिमोटद्वारे पुष्पहार चढवला असून सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. तब्बल साडेतीनशे किलोचा हार आज हनुमान मूर्तीवर चढवला आहे. दरम्यान, या भल्यामोठ्या हाराची किंमत तब्बल 55 हजार रूपये असल्याचे सांगितले जात आहे. ढोल ताशांच्या गजरात याठिकाणी हनुमान जयंती उत्सव साजरा होतोय.
Published on: Apr 06, 2023 04:18 PM