Beed | ST Strike | परळी एसटी आगारातील कर्मचाऱ्यांचे अजूनही आंदोलन सुरुच

| Updated on: Dec 03, 2021 | 4:55 PM

परळी सलग 29 व्या दिवशी देखील परळी एसटी आगारातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत जे कर्मचारी कामावर रुजू झाले नाही. अशा 86 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.

परळी सलग 29 व्या दिवशी देखील परळी एसटी आगारातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत जे कर्मचारी कामावर रुजू झाले नाही. अशा 86 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. निलंबनच काय तर सेवा समाप्ती दिली तरी आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत, अशी भूमिका परळी आगारातील कर्मचाऱ्यांनी घेतलीय. परळी आगारात 347 कर्मचारी आहेत. त्यातील 86 कर्मचाऱ्यांचं आत्तापर्यंत निलंबन करण्यात आले आहे. जोपर्यंत विलिनीकरणाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत संप असाच सुरू राहील असं पुन्हा या कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Rajesh Tope | ज्या लोकांचं लसीकरण राहिलंय त्यांनी करुन घ्यावं, राजेश टोपे यांची आवाहन
Pune | पुण्यातील नामांकित ज्वेलर्सला गंडा घालणाऱ्या महिलेला हडपसर पोलिसांनी केली अटक