अंधेरी सबवे बंद! पाऊस काय थांबेना…मुंबईत धो धो!!

| Updated on: Jul 01, 2022 | 10:36 AM

मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल झालेले आहेत. परिसरात पाणी साचलेलं आहे, रस्ते पाण्याखाली आहेत. दादर हिंदमाता परिसरात देखील पाणी साचलेलं आहे यासगळ्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय.

मुंबई: पावसाचं पाणी साचल्यानं अंधेरी सबवे (Andheri Sub Way) बंद करण्यात आलेला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल झालेले आहेत. परिसरात पाणी साचलेलं आहे, रस्ते पाण्याखाली आहेत. दादर (Dadar) हिंदमाता (Hindamata) परिसरात देखील पाणी साचलेलं आहे यासगळ्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. दरम्यान मुबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. हवामान विभागानेही 1 आणि 2 जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दिली आहे. मुंबईत 24 तासात 163 मिलीमीटर पाऊस झालेला आहे.

 

 

Published on: Jul 01, 2022 10:36 AM
मुंबईचे हाल! मुसळधार!! 24 तासात 163 मिलीमीटर पाऊस
Mumbai Rains: जोर जोर से बरसा पानी, पानी ने वाट लगायीं! जिथं तिथं निस्ता पाऊस…