Jalgaon : रिक्षातून तोल गेल्यानं गंभीर इजा होऊन विद्यार्थिनीचा मृत्यू
धावत्या रिक्षेतून (Rickshaw) तोल गेल्याने अकरावीमधील 17 वर्षीय विद्यार्थिनी (Student) खाली पडली. या अपघातात (Accident) तिच्या मेंदूला गंभीर इजा झाली. यानंतर जळगावला नेताना वाटेतच तिचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली.
धावत्या रिक्षेतून (Rickshaw) तोल गेल्याने अकरावीमधील 17 वर्षीय विद्यार्थिनी (Student) खाली पडली. या अपघातात (Accident) तिच्या मेंदूला गंभीर इजा झाली. यानंतर जळगावला नेताना वाटेतच तिचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. तृप्ती भगवान चौधरी असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. एस.टी. बंद असल्यामुळे तृप्ती रिक्षाने महाविद्यालयात ये जा करत होती. व हाच रिक्षाचा प्रवास तिच्यासाठी जीवघेणा ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. तृप्ती चौधरी ही विद्यार्थिनी बोदवड येथील न. ह. रांका कॉलेजमध्ये अकरावी विज्ञान शाखेला शिकत होती. ती एस. टी. ने प्रवास करायची मात्र गेल्या काही दिवसांपासून एस. टी. कर्मचार्यांचा संप सुरू असल्याने एस. टी. बंद आहे. त्यामुळे तृप्ती रिक्षानेच महाविद्यालयात ये जा करत होती. कॉलेज सुटल्यानंतर मैत्रिणींसोबत शेलवड येथे घरी आॅटोरिक्षाने निघाली. प्रवासात अचानक हात निसटून तोल गेल्याने तृप्ती व तिची मैत्रीण रोहिणी राजेंद्र धनगर या दोन्ही धावत्या रिक्षातून खाली पडल्या. गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला.