आता दुर्गप्रेमींची प्रतीक्षा संपली, तोरणा गडाच्या संबंधित शिवप्रेमींसह गडप्रेमींना आनंदाची बातमी
VIDEO | गड, किल्ले सर करणाऱ्या शिवप्रेमी आणि गडप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी, बघा व्हिडीओ
पुणे : गड, किल्ले सर करणाऱ्या शिवप्रेमी आणि गडप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील तोरणा गडाच्या बिन्नी दरवाज्याचा मार्ग अखेर चार महिन्यांनंतर सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. शनिवार 13 मे पासून तोरणा गडाच्या बिन्नी दरवाज्याचा मार्ग पर्यटकांना खुला करण्यात येणार आहे. तोरणा गडाच्या बिन्नी दरवाजा आणि बुरुज्यांच्या डागडुजीच्या कामाकरता गेल्या चार महिन्यांपासून हा मार्ग पर्यटनासाठी बंद करण्यात आला होता. पुरातत्व विभागाकडून तोरणा गडाच्या बिन्नी दरवाजा आणि बुरुज्यांची डागडुजी करण्यात आली आहे. गडावर जाण्यासाठी वेल्हेमार्गे बिन्नी दरवाजा हा प्रमुख मार्ग आहे, त्यामुळं आता पुन्हा हा मार्ग पर्यटकांसाठी खुला होणार असल्याने गडप्रेमींची प्रतीक्षा संपली आहे आणि शिवप्रेमींसह गडप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
Published on: May 12, 2023 08:52 AM