बेपत्ता भाजपच्या नेत्या सना खान प्रकरणात मोठी अपडेट, नर्मदा नदी पात्रात आढळला मृतदेह…

| Updated on: Aug 16, 2023 | 4:59 PM

VIDEO | नागपूरमधील भाजपाच्या अल्पसंख्यांक विभागाच्या नेत्या सना खान काही दिवसांपासून होत्या बेपत्ता, अन् आता मध्यप्रदेशातील सिहोरीत सना खान यांचा मृतदेह मिळाल्याची माहिती, नर्मदा नदीपात्रात सापडलेला मृतदेह सना खान यांचा का?

मध्यप्रदेश, १६ ऑगस्ट २०२३ | नागपुरातील भाजपच्या कार्यकर्त्या सना खान या गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झाल्या होत्या. सना खान या मध्यप्रदेशातील जबलपूर येथे व्यावसायिक कामासाठी गेल्या होत्या आणि त्या परत महाराष्ट्रात परतल्याच नव्हत्या. या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. मध्यप्रदेशच्या सिहोरीत सना खान यांचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळत आहे. सिहोरा गावातून वाहणाऱ्या नर्मदा नदीपात्रात हा मृतदेह सापडला आहे. अजून या बद्दल काहीही अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही. सना खानचा नवरा अमित ऊर्फ पप्पू साहू या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. रॉडने प्रहार करुन सना खानची हत्या केल्याची कबुली पप्पू साहू याने दिली आहे. त्यानंतर मृतदेह हिरेन नदीत फेकून दिला. पप्पू साहूने ज्या ठिकाणी सना खान यांचा मृतदेह फेकला, ती हिरेन नदी 3 किलोमीटरवर नर्मदा नदीला मिळते. मृतदेह हिरेन नदीतून नर्मदा नदीत वाहत आल्याची शक्यता आहे

Published on: Aug 16, 2023 04:47 PM