Parbhani | पती-पत्नीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Parbhani | पती-पत्नीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

| Updated on: Mar 28, 2022 | 8:09 PM

अर्जुनचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला तर प्रियंकाचा मृतदेह पलंगावर आढळून आला. याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात घटनेची माहिती कळविण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेची सत्यता तपासण्यात येणार आहे.

परभणी : अज्ञात कारणातून पती-पत्नी (Husband-Wife)ने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना परभणीतील सेलू शहरात राजीव गांधी नगरमध्ये उघडकीस आली आहे. अर्जुन गणेश आवटे (32) आणि प्रियंका अर्जुन आवटे (28) अशी मयत पती-पत्नीची नावे आहेत. अर्जुनचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला तर प्रियंकाचा मृतदेह पलंगावर आढळून आला. याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात घटनेची माहिती कळविण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेची सत्यता तपासण्यात येणार आहे. मात्र घटनेमुळे सेलू शहरात विविध चर्चांना उधाण आला आहे.

अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उन्हाळी सुट्ट्या रद्द; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Sanjay Raut यांच्या पुतना मावशी विधानावर Sudhir Mungantiwar यांची प्रतिक्रिया