‘माझ्या भजनाला डान्स ते डान्स म्हणाले’, गुणरत्न सदावर्ते यांची कुणावर टीका

| Updated on: Apr 06, 2023 | 5:55 PM

VIDEO | 'माझ्या रामभजनाला त्यांनी बीभत्स स्वरूपाचे कोर्टासमोर मांडले हे पाप आहे त्यांना ते महागात पडेल', गुणरत्न सदावर्ते भडकले

मुंबई : गेल्या आठवड्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांना महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने सदावर्त यांची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली होती. बार कौन्सिलच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी सदावर्ते यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. या कारवाई विरोधात सदावर्ते यांनी हायकोर्टात दाद मागितली होती. दरम्यान वकील गुणरत्न सदावर्ते यांना कोणताही तातडीचा दिलासा देण्यास मुंबई हायकोर्ट आणि नकार दिल्याचे समोर आले आहे. यावर सदावर्ते म्हणाले आर्टिकल 35 नुसार बार अँड कौन्सिलने माझी परवानगी नाकारली असली तरी आर्टिकल 32 नुसार मी माझी बाजू मांडू शकतो. बार अँड कौन्सिल पुन्हा एकदा ही चौकशी करेल, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यांनी प्रोसिजर फॉलो केली नव्हती असे कोर्टासमोर स्पष्ट झाले आहे. माझ्या रामभजनाला त्यांनी बीभत्स स्वरूपाचे कोर्टासमोर मांडले हे पाप आहे त्यांना ते महागात पडेल. या देशांमध्ये राम भजन म्हणणं हा गुन्हा आहे का मी कोर्टात डंके की चोट पे माझी बाजू मांडेल असे सदावर्ते म्हणाले

Published on: Apr 06, 2023 05:54 PM
बुलेट चालवत गिरीश महाजन सावरकर गौरव यात्रेत सहभागी, बघा व्हिडीओ
‘सुषमा अंधारे, राखी सावंत दोघी बहिणी अन्…’, भाजप नेत्याच्या टीकेवरून पुन्हा वाद पेटणार?