अमृता फडणवीस धमकी प्रकरणात मोठं अपडेट, अनिल जयसिंघानी आता मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात
VIDEO | अनिल जयसिंघानीला मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने पोलिसांना दिलेत
मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी फरार बुकी अनिल जयसिंघानीच्या मुंबई क्राईम ब्रांचनं अनिल जयसिंघांनीला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता अनिल जयसिंघानीला मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात अनिल जयसिंघानी हा अटकेत असताना हे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई सत्र न्यायालयाने पोलिसांना अनिल जयसिंघानीबाबतचे हे आदेश दिले आहेत. अनिल जयसिंघानीच्या जामिनावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने हे आदेश पोलिसांना दिले, परंतु मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवल्याची माहितीही समोर येत आहे.
Published on: Mar 31, 2023 04:46 PM