15 ऑगस्टच्या आधी मंत्रीमंडळ विस्तार होणार- फडणवीस
15 ऑगस्टच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होणार, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार यासंदर्भातील प्रश्न फडणवीसांना विचारला गेला होता.
15 ऑगस्टच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होणार, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार यासंदर्भातील प्रश्न फडणवीसांना विचारला गेला होता. शिवसेनेतील सत्ता संघर्ष आणि फूट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी अपेक्षित असलेली सुनावणी लांबणीवर गेली असून आता ती 12 ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारही लांबणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.