मालवाहू बोट बुडाली, मोठं आर्थिक नुकसान ! व्हिडीओ वायरल

| Updated on: May 15, 2022 | 6:31 PM

यावेळी अनेक दुर्घटना (Cargo Boat) घडल्याच्याही बातम्या समोर आल्या आहे. आता पुन्हा अशीच एक घटना घडली आहे. मुंबई (Mumbai) जवळील समुद्रात एक बोट दुर्घटना घडली आहे. बालार्ड पिअर जवळ एका बोटीला अपघात होऊन ही बोट बुडाली आहे.

मुंबई : मुंबई (Mumbai) आणि महाराष्ट्राला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर बंदरांचं मोठं जाळं आहे अनेक बोटींतून आणि जहाजातून (Ship) मालवाहूक होत असते. यावेळी अनेक दुर्घटना (Cargo Boat) घडल्याच्याही बातम्या समोर आल्या आहे. आता पुन्हा अशीच एक घटना घडली आहे. मुंबई जवळील समुद्रात एक बोट दुर्घटना घडली आहे. बालार्ड पिअर जवळ एका बोटीला अपघात होऊन ही बोट बुडाली आहे. ही एक मालवाहू बोट असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र या बोट दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाल्याची माहिती समोर आली नाही. या दुर्घनेतून तिघांना वाचवण्यात यश आलं आहे. मात्र यात मोठं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Published on: May 15, 2022 06:31 PM
Pune Andolan : पुण्यात पतित पावन संघटनेकडून गुडलक चौकात आंदोलन
आयो ! वादळ शिरलं, मंडप उडाला…