Uday Samant | 22 ऑक्टोबरपासून महाविद्यालय सुरु होणार, उदय सामंत यांची पत्रकार परिषद LIVE
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या संकटापायी बंद असलेले कॉलेज पुन्हा सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॉलेज सुरु करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरू होणार असल्याची माहिती दिलीय. विद्यार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस आवश्यक असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलंय. 20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी नियमावली करण्यात आलीय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बांधकाम मंत्री आणि सचिव यांची एक बैठक झाली, या बैठकीतच हा निर्णय घेण्यात आलाय. विद्यापीठ महाविद्यालय वर्ग 50% पेक्षा अधिक सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरणाला देण्यात आलेत, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिलीय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.