अयोध्येतील राम मंदिराचं काम वेगाने सुरु, बघा एक्स्क्लुझिव्ह व्हिडीओ; कधी होणार दर्शनासाठी खुलं

| Updated on: Apr 08, 2023 | 4:24 PM

VIDEO | 'या' दिवशी अयोध्येतील श्री रामाचं मंदिर दर्शनासाठी होणार खुलं, बघा कसं सुरूये मंदिराचं काम?

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराचं काम वेगाने सुरु आहे. तर मकर संक्रांतीनंतर जानेवारी २०२४ मध्ये हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे. दरम्यान, अयोध्येतील या मंदिराचं काम २४ तास सुरू असून या मंदिर परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राम मंदिराचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. या मंदिरात रामललाची मूर्ती ५१ इंच असेल, जी गर्भगृहात बांधलेल्या व्यासपीठावर स्थापित केली जाणार आहे. राजस्थान येथून आलेले हे कारागीर अयोध्येच्या राममंदिरातील दगडांवर आकर्षक कोरीव काम करताना दिसत आहेत. जानेवारी २०२४ मध्ये हे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं होणार असल्यानं राजस्थान येथून आलेले हे कामगार त्यांच्या कामात गुंतल्याचेही पाहायला मिळत आहे.

Published on: Apr 08, 2023 04:03 PM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न, पण…; उदय सामंत यांची प्रतिक्रिया
प्रभू श्रीरामच्या घोषणा अन् मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या जयजयकारासह वारकरी निघाले अयोध्या वारीला