VIDEO : Adv. Pradeep Gharat | ‘राणा दाम्पत्य गैरहजर राहिल्याने सुनावणी पुढे ढकलली’

| Updated on: May 18, 2022 | 1:08 PM

सरकारी वकील घरत म्हणाले, आज कोर्टामध्ये राणा दाम्पत्याला मागच्या तारखेला नोटीस देऊन हजर राहायला सांगितलं होतं. पण खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज कोर्टात हजर झाले नाही. त्यांच्या वतीनं त्यांचे वकील कोर्टात हजर होते. घरत यांनी सांगितलं की, मी कोर्टात आल्यानंतर मला कळलं की आम्हाला नोटीसची कॉपीच दिलेली नाही.

सरकारी वकील घरत म्हणाले, आज कोर्टामध्ये राणा दाम्पत्याला मागच्या तारखेला नोटीस देऊन हजर राहायला सांगितलं होतं. पण खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज कोर्टात हजर झाले नाही. त्यांच्या वतीनं त्यांचे वकील कोर्टात हजर होते. घरत यांनी सांगितलं की, मी कोर्टात आल्यानंतर मला कळलं की आम्हाला नोटीसची कॉपीच दिलेली नाही. सर्वोच्च न्यायालयानं 124 ए ही कलम स्थगित ठेवलंय. पण केसमध्ये इतर सेक्शनही असल्यामुळे आणि आरोपींनी अटी आणि शर्थीचा भंग केला. 124 या सेक्शनचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळं त्याच्यावर आम्ही युक्तिवाद करण्यासाठी न्यायालयासमोर प्रार्थना केली. नोटीस लागली नसली तरी आरोपींचे वकील न्यायालयासमोर हजर होते. त्यामुळं युक्तिवाद ऐकण्यास काही हरकत नाही, असं आम्ही न्यायालयाला सांगितलं.

Published on: May 18, 2022 01:08 PM
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 18 May 2022
VIDEO : Madhya Pradesh | ‘एका आठवड्यात निवडणुका जाहीर करा’;सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश