Ajit Pawar UNCUT PC | परदेशातील विमानं बंद करण्याचा निर्णय पंतप्रधानांच्या बैठकीत होईल : अजित पवार

Ajit Pawar UNCUT PC | परदेशातील विमानं बंद करण्याचा निर्णय पंतप्रधानांच्या बैठकीत होईल : अजित पवार

| Updated on: Nov 27, 2021 | 6:00 PM

जागतिक स्तरावर नव्याने सापडलेल्या कोरोना व्हेरियंट आला आहे. या सगळ्याचा एकंदरीत अंदाज घेतला जाईल. त्यानंतरच्या 31 डिसेंबरला या जम्बो रुग्णालये सुरु ठेवायची की बंद करायची हा निर्णय घेतला जाईल.

पुणे : येत्या 1 डिसेंबरपासून कोरोना नियमात शिथिलता आणत शहरतील सर्व चित्रपटगृहे, सांस्कृतिक केंद्रे पूर्ण क्षमेतेने सुरु करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी कोरोनाच्या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक राहिल. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेता असताना सर्वकाही सुरळीत चालेले असल्याचे दिसून आले आहे. आढावा बैठकीनंतर अजित पवारांनी माध्यमाशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनासाठी तयार करण्यात आलेली जम्बो रुग्णालय बंद न करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. जागतिक स्तरावर नव्याने सापडलेल्या कोरोना व्हेरियंट आला आहे. या सगळ्याचा एकंदरीत अंदाज घेतला जाईल. त्यानंतरच्या 31 डिसेंबरला या जम्बो रुग्णालये सुरु ठेवायची की बंद करायची हा निर्णय घेतला जाईल.