शाळा सुरु करण्याबाबत राज्यस्तरीय निर्णय घेऊ, अजित पवारांची माहिती

| Updated on: Dec 10, 2021 | 1:59 PM

राज्यभरातील शहरी आणि ग्रामीण शाळांसंदर्भात सरसकट निर्णय राज्य सरकारच्या पातळीवरच घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच दिली.

राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय एवढे दिवस जिल्हाधिकारी आणि महापालिका प्रशासनावर सोपवण्यात आला होता. त्यामुळे राज्यातील काही शहरांच्या शाळा सुरु तर काही ठिकाणच्या बंद आहेत. त्यामुळे राज्यभरात विविध पातळ्यांवर मतभेद दिसून येत आहेत. त्यामुळे आता राज्यभरातील शहरी आणि ग्रामीण शाळांसंदर्भात सरसकट निर्णय राज्य सरकारच्या पातळीवरच घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच दिली. पुण्यात आज ते पत्रकारांशी बोलत होते.

Atul Bhatkhalkar | महापौरांना किशोरी पेडणेकरांना सुरक्षा द्या, धमकीनंतर भाजप आमदाराची मागणी
Manisha Kayande | महापौरांना अतिशय गलिच्छ भाषेतलं पत्र आलंय