VIDEO : Ajit Pawar Uncut | शाळा सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, अजित पवार यांची माहिती
शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं भाष्य केलं आहे. अजित पवार म्हणाले की, शाळा सुरु करण्याबाबत दोन मतप्रवाह आहेत. मात्र, शाळा सुरू करण्यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. तसेच अजित पवार म्हणाले की, पुन्हा सर्व बंद पाडण्याची निर्णय घेण्याची वेळ आणू नका.
शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं भाष्य केलं आहे. अजित पवार म्हणाले की, शाळा सुरु करण्याबाबत दोन मतप्रवाह आहेत. त्यानुसार दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याचं काही लोक म्हणतात, तर दुसरा मतप्रवाह आहे तो म्हणजे शून्य टक्के रुग्ण आहे, तिथे शाळा सुरु करा असे म्हणत आहेत. याबाबत मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतील, अशी माहीती अजित पवार यांनी केली. अजित पवार म्हणाले, ग्रामीण भागात लोक कोरोनायचे नियम पाळत नाही म्हणून ही वेळ आली आहे. पुन्हा सर्व बंद पाडण्याची निर्णय घेण्याची वेळ आणू नका. सगळंच बंद करण्याची वेळ आणू नका, असं अजित पवार म्हणाले.