Special Report | शिंदे-फडणवीसांमध्ये जाहिरातीवरुन नाराजी संपली..ऑल इज वेल?
VIDEO | आधी 'शोले' आता 'जय-वीरु', आधी देहबोली वेगळी अन् भाषणात देवेंद्र फडणवीस यांचा सिक्सर, नेमकं काय म्हणाले फडणवीस? बघा स्पेशल रिपोर्ट
पुणे : शिंदे यांच्या शिवसेना जाहिरातीनंतर भाजपने जाहीर नाराजी व्यक्त केली. मात्र पालघरच्या एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सारं काही अलबेल असल्याचे सांगितलं. आमची जय विरूची जोडी असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले तर एखाद्या जाहिरातीमुळे किंवा कोणाच्या वक्तव्यामुळे या सरकारला काही होईल, इतकं हे सरकार तकलादू नाही किंवा त्यानं काही फरक पडत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवसेनेच्या जाहिरातीवरून सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केला. पालघरमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय विरू यांची जोडी असल्याचे म्हणत फेव्हिकॉल का मजबूत जोड है, तुटेगा नहीं असे म्हटले. तर ही युती खुर्चीसाठी झालेली नाही, असे म्हणत असताना फडणवीस यांनी स्मित हास्य करत एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला दाद दिली. दरम्यान, त्यापूर्वी दोन घटनांमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची देहबोली वेगळी दिसली. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…