Special Report | भाजप-शिंदेंमधल्या युतीत राणे-केसरकरांमुळं मिठाचा खडा?
यापुढे राणेंविरोधात बोलणार नसल्याचं केसरकरांनी जाहीर करुन टाकलं. त्यामुळं शिवसेना नेत्यांनीही केसरकरांना चिमटे काढले. कोकणात ज्या राणेंविरोधात आयुष्यभर राजकीय संघर्ष केला. त्याच राणेंविरोधात आता बोलायचं नाही. टीकाटिप्पणी करायची नाही असा आदेश केसरकरांना आल्याचं कळतंय. केसरकरांसाठी हा आदेश पाळणं..म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यासारखं आहे.
मुंबई : राणे(Rane) आणि दिपक केसरकरांमधला(Deepak Kesarkar) हा वाद थांबलाय असं वाटत होतं. पण तो वाद पुन्हा सुरु झालाय. त्याला कारण ठरलीय ती दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद. नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंची बदनामी केल्याचा आरोप केसरकरांनी केला. त्याला नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं.
केसरकरांनी केलेल्या आरोपांमुळं नारायण राणे नाराज झाल्याची चर्चा होती. त्यामुळं शिंदे गटाचे प्रवक्ते असलेले किरण पावसकर काल थेट राणेंच्या घरीच पोहोचले. दीपक केसरकरांच्या विधानांनी शिंदे गट आणि भाजपमध्ये दुरावा निर्माण होऊ नये यासाठी केसरकरांना ताकीद देण्यात आल्याचीही माहिती आहे. त्यामुळंच यापुढे राणेंचं नाव घेणार नाही अशी भूमिका केसरकरांनी घेतलीय.