ठाणेकरांनो… येऊरला जाताय? ‘या’ वेळेनंतर बाहेर पडता येणार नाही, काय आहे कारण?

| Updated on: Apr 15, 2023 | 6:46 AM

VIDEO | ठाण्यातील येऊरला जाण्यासाठी नवे नियम, कधी होणार अंमलबजावणी आणि कधी असणार प्रवेश बंदी, बघा व्हिडीओ

ठाणे : गेल्या अनेक दिवसांपासून येऊरमधील अनधिकृत हॉटेल, हॉटेल मधील धिंगाणा, डिजेचा कर्णकर्कश आवाज प्राण्यांना होणार त्रास या विरोधात आदिवासींनी एल्गार पुकारला आहे. त्यानंतर वनखाते सक्रीय झाले असून गुरूवारी झालेल्या बैठकीत येऊरमधील प्रवेशासाठी रात्री ११ वाजता प्रवेशद्वार बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत येऊरमध्ये कोणालाही प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे रात्री ११ नंतर कोणाला येऊर मधून बाहेरही पडता येणार नाही.

ठाण्याला पश्चिमेला लागून भले मोठे असे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान लाभले आहे. याच उद्यानात अनेक वन्य प्राणी पक्षी आणि आदिवासी बांधवांचा वावर असतो. मात्र हळूहळू जे जंगल नाहीसे होत चालले असल्याने स्थानिक आदिवासी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. येथे मोठ्या प्रमाणात रात्रभर सुरू असलेल्या पार्ट्या, DJ चा मोठ्या प्रमाणात आवाज, रात्रभर चालणारे क्रिकेट तर्फ, दारू व अमली पदार्थ विकणे, कचरा जंगलात टाकणे, अनाधिकृत पार्किंगसह येऊर येथे हे सर्व प्रकार खुलेआम सुरू असून आदिवासीं बांधवांनी ‘येऊर जंगल वाचवा’ मोहीम सुरू केली आहे.

येऊर आदिवासी वनहक्क समितीच्या वतीने आक्रमक पाऊल उचलल्यानंतर ४ एप्रिल रोजी वनखाते, ठामपा अधिकारी यांची वनमंत्री सुधीर मुंनगंटीवार यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत येऊरमधील अनधिकृत बांधकामे आणि चालणारा धिंगाणा यावर चर्चा झाली होती.

Published on: Apr 15, 2023 06:46 AM
‘या’ रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी खुशखबर, रविवारचा मेगाब्लॉक होणार रद्द, कारण…
विजय वड्डेटीवार यांनी आपल्या कन्येला संस्कार द्यावेत, भाजप नेत्यानं काय केली सडकून टीका?