अरे कुणी शेतकऱ्याच्या द्राक्षाला भाव देतं का रे भाव ? शेतकरी हतबल
सोलापूर जिल्ह्यात, बदलत्या हवामानामुळे मोठं नुकसान झालंय. सगळ्यात जास्त खर्च द्राक्षाच्या पिकांवर होतो. बदलत्या हवामानाचा सगळ्यात जास्त परिणाम द्राक्षाच्या पिकावर परिणाम होतो. खताच्या, फवारणीच्या किंमती वाढत चालल्यात. द्राक्षाचं पीक घ्यायला जास्त खर्च होतो पण द्राक्षाला म्हणावा तसा भाव मिळत नाही.
पंढरपूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यात, बदलत्या हवामानामुळे मोठं नुकसान झालंय. सगळ्यात जास्त खर्च द्राक्षा (Grapes) च्या पिकांवर होतो. बदलत्या हवामानाचा (Change In Climate) सगळ्यात जास्त परिणाम द्राक्षाच्या पिकावर परिणाम होतो. खताच्या, फवारणीच्या किंमती वाढत चालल्यात. द्राक्षाचं पीक घ्यायला जास्त खर्च होतो पण द्राक्षाला म्हणावा तसा भाव मिळत नाही. अशा बऱ्याच कारणांमुळे द्राक्षाच्या बागा सडून चाललेला आहेत. माल नासायला लागलाय आणि याचं फक्त खत होणार आहे. हतबल झालेल्या शेतकऱ्याकडे कुणाचंच लक्ष नाही. अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गाकडून येतीये.