भगवं वादळ मुंबईच्या तोंडावर… दोन दिवसात मायानगरीत आवाज मराठ्यांचाच… मोर्चा कुठपर्यंत आलाय?

| Updated on: Jan 24, 2024 | 1:55 PM

मराठा आरक्षणासाठी जालन्याच्या अंतरवाली सराटीतून मराठ्यांची सुरू झालेली पदयात्रा आज पुण्यात येऊन पोहोचली आहे. मनोज जरांगे पाटील हे पुण्यातून निघणार असून औंध मार्गे चिंचवड आणि पुणे- मुंबई जुना महामार्गाने लोणावळ्याकडे निघणार

मुंबई, २४ जानेवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील यांच्या पद यात्रेचा आज पाचवा दिवस आहे. मराठा आरक्षणासाठी जालन्याच्या अंतरवाली सराटीतून मराठ्यांची सुरू झालेली पदयात्रा आज पुण्यात येऊन पोहोचली आहे. मनोज जरांगे पाटील हे पुण्यातून निघणार असून औंध मार्गे चिंचवड आणि पुणे- मुंबई जुना महामार्गाने लोणावळ्याकडे निघणार आहेत, त्यापूर्वी ठिक-ठिकाणी पदयात्रेतील मराठा बांधवांसाठी पाण्याच्या बाटल्या वाटप करण्याची तयारी सुरू केलीय, पिंपरी चिंचवडच्या वेशीवर सांगवी ,रक्षक चौक, जगताप डेअरी अशा प्रत्येक ठिकाणी जरांगे पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पदयात्रेचा मार्ग ज्या शहरातून जात असल्याने पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. खराडी येथून सुरू झालेली पदयात्रा नगर रोडने महालक्ष्मी लॉन्स ते जहाँगिर हॉस्पिटल ते संचेती हॉस्पिटल व तेथून शिवाजीनगर कृषी महाविद्यालय समोरील चाफेकर चौकातूक गणेश खिंड रोडने विद्यापीठ चौकात जाणार आहे.

Published on: Jan 24, 2024 01:55 PM
क्युरेटिव्ह पिटीशनने तिढा सुटणार? मराठा आरक्षणासंदर्भातील आज पहिली सुनावणी, कोर्टात काय घडणार?
विरोधकांच्या आघाडीला मोठं भगदाड, ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतून बाहेर अन्…