बेस्टच्या ताफ्यात पहिली वातानुकुलीत इलेक्ट्रिक डबलडेकर बस, बघा एक झलक

| Updated on: Feb 13, 2023 | 3:05 PM

VIDEO | बेस्टच्या ताफ्यात पहिली वातानुकुलीत इलेक्ट्रिक डबलडेकर बस दाखल, बघा व्हिडीओ

मुंबई : बेस्टच्या ताफ्यात आज पहिली वातानुकुलीत इलेक्ट्रिक डबलडेकर बस दाखल झाली आहे. टप्याटप्याने एकूण 200 बस या बेस्टच्या ताफ्यात दाखल होतील मात्र सध्या आज कुलाबा आगारात पहिली वातानुकुलीत इलेक्ट्रिक डबलडेकर बस ही दाखल झाली आहे. यामध्ये 65 आसन सीट असणार आहेत तर 76 जणांना प्रवास करता येणार आहे. यामध्ये चालक वाहक संपर्कासाठी विशेष व्यवस्था असणार आहे. यासोबत स्मार्टकार्ड सुविधा व सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा असणार आहेत. यासह बेस्ट मुंबईकरांना प्रदुषणमुक्त प्रवास घडविण्यासाठी आपल्या ताफ्यात मार्च 2024 पर्यंत तब्बल चार हजार ई-बसेसचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बेस्टने या बसेस चार्ज करण्यासाठी एकूण 55 ठिकाणी तब्बल 330 ई – चार्जिंग स्टेशनची उभारणी करणार आहे. त्यातील दहा चार्जिंग स्टेशन मार्च 2023 पर्यंत तयार होणार आहेत.

Published on: Feb 13, 2023 03:05 PM
उद्धव ठाकरेंच्या तब्येतीचं कारण समजू शकतो, पण आदित्य ठाकरे तरी कुठे…; केसरकरांचा पलटवार
राजीनाम्यानंतर कोश्यारी म्हणताय, महाराष्ट्रात गुंडगिरी आणि दादागिरी…