Special Report : राज्यातील सत्तासंघर्ष न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे वर्ग, गुरुवारी पहिली सुनावणी होणार

| Updated on: Aug 23, 2022 | 9:31 PM

राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पाच न्यायाधीसांच्या घटनापीठाकडं होईल. मोठ्या घटनापीठासमोर गुरुवारी पहिली सुनावणी होईल. पक्ष आणि चिन्हाबाबत गुरुवारपर्यंत निर्णय घेऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिले.

सत्ता संघर्षाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयानं पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडं वर्ग केलंय. त्यामुळं मोठं घटनापीठ आता सुनावणी करणार आहे. शिंदे-ठाकरे सत्तासंघर्षाचा निकाल लवकर लागणार की, तारीख पे तारीख सुरू राहणार हा प्रश्नचं आहे. महाराष्ट्रतील सत्तासंघर्षाचं प्रकरण अखेर पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडं वर्ग करण्यात आलं. सरन्यायाधीश रमन्ना यांनी हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडं देण्याचा निर्णय घेतला. राजकीय पक्षांची अंतर्गत लोकशाही आणि त्यात निवडणूक आयोगाची भूमिका या मुद्यांवर घटनापीठ सुनावणी करणार. यापुढं राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पाच न्यायाधीसांच्या घटनापीठाकडं होईल. मोठ्या घटनापीठासमोर गुरुवारी पहिली सुनावणी होईल. पक्ष आणि चिन्हाबाबत गुरुवारपर्यंत निर्णय घेऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिले.

Published on: Aug 23, 2022 09:30 PM
Special Report : एकनाथ शिंदे-अजित पवारांमध्ये शाब्दिक चकमक, शिंदे म्हणाले, मी तुमचा चिठ्ठा काढू शकतो…
मुंबई महापालिकेत देशांतील सर्वात मोठा घोटाळा; भाजप आमदार अमित साटम यांचे गंभीर आरोप