G20 Summit | राजधानी दिल्ली G20 शिखर परिषदेसाठी सज्ज, कशी सुरूये तयारी Watch Video

| Updated on: Sep 07, 2023 | 1:48 PM

VIDEO | येत्या शनिवारी आणि रविवारी नवी दिल्ली येथे G20 शिखर परिषदेचे आयोजन, ब्रिटन, अमेरिका, सौदी अरेबिया, फ्रान्ससह अनेक देशांचे प्रमुख या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. बघा कशी सुरूये तयारी

नवी दिल्ली, ७ सप्टेंबर २०२३ | येत्या शनिवारी आणि रविवारी नवी दिल्ली येथे G20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय G20 शिखर परिषदेसाठी राजधानी दिल्लीमध्ये जोरदार तयारी सुरू असून दिल्ली आता यासाठी सज्ज झाली आहे. या G20 शिखर परिषदेच्या बैठकीसाठी G20 देशांचे प्रमुख नेते हजेरी लावणार आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना आज रात्रीपासून प्रवेश बंद करण्यात आला आहे. अवघे काही तास बाकी असलेल्या G20 शिखर परिषदेकरता नवी दिल्लीमध्ये दिग्गजांची मांदियाळी बघायला मिळणार आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये G20 शिखर परिषदेसंदर्भात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीत G 20 परिषदेचे काउंटडाऊन सुरू झाले असल्याने आज संध्याकाळपासून वेगवेगळ्या राष्ट्रांचे प्रमुख राजधानी दिल्लीत दाखल होणार आहेत.

Published on: Sep 07, 2023 01:48 PM
Balasaheb Thorat यांचा हल्लाबोल, ‘भाजपनं खोटेनाटे आश्वासन दिले अन् सत्तेत जाऊन बसले’
Naresh Mhaske म्हणाताय, ‘टेंभीनाका दहीहंडीची पंढरी अन् गोविंदाच आमचा सेलिब्रिटी’