Special Report | ‘अल्ला हूँ अकबर’ची घोषणा देणाऱ्या मुस्कानला 5 लाखांचे बक्षीस
Hijab controversy : या व्हिडीओमध्ये मुस्कान खान ही विद्यार्थीनी आपली दुचाकी कॉलेजच्या आवारात पार्क करते. यानंतर ही विद्यार्थीनी कॉलेजमध्ये प्रवेश करण्यासाठी इमारतीच्या दिशेनं चालू लागते. दरम्यान, मुस्कानला घेराव घालण्याचा प्रयत्न होतो.
कर्नाटक : कर्नाटकातील एक व्हिडीओ (Karnatak Video) मंगळवारी समोर आला होता. एक हिजाब (Hijab) घातलेल्या मुलीला अडवणारे, तिच्यावर चिथावणीखोर आणि भडकावू घोषणा देणाऱ्या तरुणांचा हा व्हिडीओ मंगळवारी तुफान गाजला. या व्हिडीओतील ज्या मुलीला तरुणांनी जय श्री रामच्या घोषणा देत हिजाबविरोधात निदर्शनं केली, त्या मुलीला आता पाच लाख रुपयांचं बक्षिस (5 Lakh Rs Reward) जाहीर करण्यात आलं आहे. जय श्री रामच्या घोषणांमधून कॉलेजात प्रवेश करत जाणारी ही मुलगीही अल्ला हूँ अकबरच्या घोषणा देताना दिसली होती. हात उंचावून तिनं आपला खाक्या घोषणेतून दाखवून दिला होता. कर्नाटकात हिजाब विरद्ध भगवा असा संघर्ष पेटलेला असतानाच आता या विद्यार्थीनीला एकानं चक्क पाच लाख रुपयांचं बक्षिस दिलंय. जमीयत उलेमा-ए-हिंद या संस्थेकडून हे बक्षिस जाहीर करण्यात आलंय.