Sangli | 60 ते 70 किलो वजनाच्या सुलतानची देशभरात चर्चा
शेळी पालनाचा त्यांचा व्यवसाय असून त्यांच्यापैकी एका शेळीने या सुलतानला जन्म दिला. त्याच्या कपाळावर चांद असल्यानं लवकरच तो चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे त्याच्या विक्रीसाठी 5 ते 6 लाख रुपये किंमत अपेक्षित होती. पण आता तीच किंमत थेट 20 ते 25 लाखांवर गेल्याचा दावा सोनू शेट्टी यांनी केला आहे
लोक सध्या विविध चिंतांनी त्रस्त असले तरी सांगलीत एक सुलतान मात्र मजेत काजू-बदाम खातोय. हा सुलतान दुसरा तिसरा कोणी नसून दीड वर्षांचा एक बोकड आहे. मिरजेतील सोनू शेट्टी यांच्याकडे शेळ्या आहेत. शेळी पालनाचा त्यांचा व्यवसाय असून त्यांच्यापैकी एका शेळीने या सुलतानला जन्म दिला. त्याच्या कपाळावर चांद असल्यानं लवकरच तो चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे त्याच्या विक्रीसाठी 5 ते 6 लाख रुपये किंमत अपेक्षित होती. पण आता तीच किंमत थेट 20 ते 25 लाखांवर गेल्याचा दावा सोनू शेट्टी यांनी केला आहे.
Published on: Jun 30, 2021 09:54 PM