Sadabhau Khot | दोन पाऊले सरकार पुढे आले, सरकारची स्वागतार्ह बाब – सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत यांनी आज आझाद मैदानावरील आंदोलकांसमोर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, आंदोलन कसे लढायचे याची रणनीती असते. तुम्ही हे आंदोलन पूर्वीपासून सुरू केले. आम्ही तुम्हाला येऊन सहभागी झालो. शेवटपर्यंत तुमच्या पाठिशी असू. मात्र, विलीनीकरणाचा प्रश्न कोर्टात आहे.
सदाभाऊ खोत यांनी आज आझाद मैदानावरील आंदोलकांसमोर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, आंदोलन कसे लढायचे याची रणनीती असते. तुम्ही हे आंदोलन पूर्वीपासून सुरू केले. आम्ही तुम्हाला येऊन सहभागी झालो. शेवटपर्यंत तुमच्या पाठिशी असू. मात्र, विलीनीकरणाचा प्रश्न कोर्टात आहे. त्यावर कोर्ट काय निर्णय देणार, सरकार काय भूमिका घेणार आणि पुढे काय, असे असायला हवे. आंदोलन सुरू ठेवायचा तुमचा निर्णय आहे. आमचा तुम्हाला पाठिंबा आहेच. मात्र, तूर्तास आम्ही बाहेर पडतोय. आमची भूमिका दुपारी बारा वाजता स्पष्ट करू. आंदोलकांनी आंदोलकांची भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन त्यांनी केले.