Hindustani Bhauची जामीनावर सुटका ? पाहा हिंदुस्थानी भाऊचे वकील काय म्हणतायत

Hindustani Bhauची जामीनावर सुटका ? पाहा हिंदुस्थानी भाऊचे वकील काय म्हणतायत

| Updated on: Feb 05, 2022 | 9:57 PM

न्यायालयाने दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर हिंदुस्तानी भाऊला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी (Student protest)चिथावल्याप्रकरणी आणि मुंबईतल्या धारावीत आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मुंबई :  हिंदुस्तानी भाऊ (Hindustani Bhau) उर्फ विकास पाठक ( Vikas Pathak) याला आज वाद्रे न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हिंदुस्थानी भाऊला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यात आणखी एक दिवसांची वाढ करण्यात आली होती. आज त्याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी अधिक चौकशीसाठी हिंदुस्तानी भाऊच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. मात्र न्यायालयाने दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर हिंदुस्तानी भाऊला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी (Student protest)चिथावल्याप्रकरणी आणि मुंबईतल्या धारावीत आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Special Report | आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी !
Special Report | अमृता फडणवीस यांच्याकडून आदित्य ठाकरे यांचा ‘छोटे राजा साहेब’ असा उल्लेख!