Nanded | विम्याचे अर्ज कंपनीकडे नव्हे तर ऊसाच्या फडात, नांदेडमधील प्रकार समोर

| Updated on: Oct 20, 2021 | 4:10 PM

 पीक विम्याची मदत (crop insurance) खात्यावर जमा झाली की नाही, याची चौकशी शेतकरी दिवसातून दोन वेळा करतोय…तलाठी, कृषी अधिकारी यांना सातत्याने विचारणा करतोय तर दुसरीकडे (Farmers’ Grievances) शेतकऱ्यांचे विमा अर्जच द्यापही विमा कंपनीकडे जमा झालेले नाहीत

पीक विम्याची मदत (crop insurance) खात्यावर जमा झाली की नाही, याची चौकशी शेतकरी दिवसातून दोन वेळा करतोय…तलाठी, कृषी अधिकारी यांना सातत्याने विचारणा करतोय तर दुसरीकडे (Farmers’ Grievances) शेतकऱ्यांचे विमा अर्जच द्यापही विमा कंपनीकडे जमा झालेले नाहीत. प्रक्रियेत काम रखडले हे ठिक आहे. पण नांदेडमध्ये अनोखाच प्रकार समोर आलाय. शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या प्रतिनीधीकडे भरुन दिलेले अर्ज थेट ऊसाच्या फडात आढळून आले आहेत. त्यामुळे विमा रक्कम देण्याची विमा कंपनीची किती मानसिकता आहे हे लक्षात येते. एक नव्हे…दोन नव्हे तर तब्बल 500 अर्ज हे ऊसाच्या फडात सापडले आहेत. त्यामुळे कसली मदत आणि काय? शेतकऱ्याच्या परस्थितीचा चेष्टा केली जात असल्याची भावना आता व्यक्त होऊ लागली आहे.

Aryan Khan Bail Hearing | आर्यन खानचा जामीन अर्ज मुंबई सेशन्स कोर्टाने फेटाळला
Aryan Khan | आर्यन खानच्या जामिनासाठी हायकोर्टात जाणार, वकिलांची माहिती