Special Report |अहमदनगरमधील धर्मांतराचा मुद्दा विधानसभेत तापला

| Updated on: Aug 24, 2022 | 11:02 PM

श्रीरामपूरमध्ये राहणाऱ्या मुल्ला कटर या नराधमानं शेजारीच राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या आयुष्याची राखरांगोळी केली. मुल्ला कटरनं अल्पवयीन मुलीवर 3 वर्षे अत्याचार केला. तिच्या कुटुंबाला धमकावलं. अल्पवयीन मुलगी गर्भवतीही राहिली. मुल्ला कटरला शेवटी तुरुंगाची हवा खावी लागली.

मुंबई :  आधी अपहरण. नंतर लैंगिक अत्याचारआणि शेवटी धर्मांतर(conversion)…नगर(Ahmednagar ) जिल्ह्यातल्या श्रीरामपूरमध्ये राहणाऱ्या मुल्ला कटर या नराधमानं शेजारीच राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या आयुष्याची राखरांगोळी केली. मुल्ला कटरनं अल्पवयीन मुलीवर 3 वर्षे अत्याचार केला. तिच्या कुटुंबाला धमकावलं. अल्पवयीन मुलगी गर्भवतीही राहिली. मुल्ला कटरला शेवटी तुरुंगाची हवा खावी लागली. या घटनेत मुल्ला कटर हा प्रमुख आरोपी होता. पण या घटनेसाठी आरोपीला मोकळीक देणारे श्रीरामपूरचे पोलीस निरीक्षक संजय सानपही तितकेच जबाबदार होते. भाजप आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत हाच मुद्दा उपस्थित केला. तुरुंगात असलेल्या आरोपीशी निलंबित पोलीस अधिकारी संजय सानपचे अजूनही लागेबांधे असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला आणि संजय सानप याला बडतर्फ करण्याची मागणी केली.

मुल्ला कटर नावाचा आरोपी नगरच्याच तुरुंगात बंद आहे. त्याला घरचं जेवण मिळत असल्याचा मुद्दाही नितेश राणेंनी उपस्थित केलाय. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत नितेश राणेंच्या आक्षेपाला उत्तर दिलं आणि जबरदस्तीनं होणारं धर्मांतर खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला. अजित पवारांनीही संबंधित अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याची मागणी केली.

देशात मध्य प्रदेश, ओडिशा, गुजरात, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि झारखंडमध्ये धर्मांतरविरोधी कडक कायदे आहेत. तसाच कायदा महाराष्ट्रात करण्याची मागणी नितेश राणेंनी केलीय. कोणीही आपल्या इच्छेने धर्म बदलू शकतो, तो त्याचा वैयक्तिक अधिकार आहे. पण जबरदस्तीनं किंवा लालसेने धर्मांतर करता येत नाही. धर्मांतर करताना पैशाचं आमिष दाखवता येत नाही. असं करणारी व्यक्ती कायदेशीर कारवाईसाठी पात्र ठरते. नगरमधल्या घटनेत आरोपीनं जबरदस्ती आणि आमिष या दोन्हींचाही वापर केलाय आणि पोलीस निरीक्षकही आरोपीला अप्रत्यक्ष मदत करत होते. त्यामुळं या घटनेला जबाबदार असणाऱ्या प्रत्येकाला कठोरात कठोर शिक्षा होण्याची गरज आहे.

Published on: Aug 24, 2022 11:02 PM
Special Report | मुदत संपूनही टोलवसुली का? कोल्हापुरात मनसे कार्यकर्ते आक्रमक
Special Report | 50 खोक्यांवरुन घोषणा, आमदारांचा राडा