‘राज ठाकरे यांचं खरंच मराठीचं प्रेम असेल तर…’, कुणी दिलं थेट आव्हान
VIDEO | 'सतत मराठी भाषेचं प्रेम दाखवतात, मग आता गप्प का?', राज ठाकरे यांना थेट कुणी केला सवाल
मुंबई : देशभरात द केरला स्टोरी (The Kerala Story ) चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. अशातच या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एका नेत्यानं मराठी भाषा आणि मराठी भाषेवरील प्रेमावरून घेरल्याचं पाहायला मिळत आहे. देशभरामध्ये द केरला स्टोरी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये धार्मिक ध्रुवीकरण असल्याचा आरोप होत आहे. तरीसुद्धा हा चित्रपट काही धार्मिक नेते महाराष्ट्र राज्यामध्ये मोफत लावत आहेत. परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये आत्ताच मराठी चित्रपट शाहीर साबळे प्रदर्शित झाला आहे. ज्या शाहीर साबळे यांनी डफावर हात मारून संयुक्त महाराष्ट्रासाठी, स्वातंत्र्य आंदोलनासाठी सांस्कृतिक लढाई केली, तोच चित्रपट मोफत दाखवण्याच्या ऐवजी धार्मिक ध्रुवीकरण करणारा द केरला स्टोरी चित्रपट राज्यातील नेते दाखवत आहेत. हे अत्यंत धक्कादायक आहे. परंतु राज ठाकरे सतत राज्यांमध्ये मराठीचे प्रेम दाखवत असतात. ते आता गप्प का ? राज ठाकरे यांना खरंच मराठीचं प्रेम असेल तर द केरला स्टोरी हा चित्रपट मोफत दाखवण्याच्या पार्श्वभूमीवर शाहीर साबळे चित्रपट मोफत दाखवावा, असे खुले आव्हानच राज ठाकरे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (सचिन खरात गट) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी दिले आहे.