पुणे शहरात कोयता गँगचा पुन्हा दहशत, कारसह दुचाकींची तोडफोड अन्…

| Updated on: May 26, 2023 | 3:30 PM

VIDEO | पुण्यात कोयता गँगचा पुन्हा घातला धुमाकूळ, कोणत्या भागात कोयता गँगचा दहशत

पुणे : पुण्यात कोयता गँगचा पुन्हा धुमाकूळ घातला आहे. कारसह दुचाकी वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कोयता गँगने केला आहे. पुण्यात कोयता गँगने पुन्हा एकदा दहशत माजवली आहे. चार ते पाच जणांच्या टोळक्याने मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हातात कोयते घेत प्रचंड दहशत माजवली. इतकेच नाही तर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना धमकावत त्यांच्या दुचाकी आणि चार चाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार बिबवेवाडीतील संत निरंकारी सत्संग भवनच्या समोर 24 मे च्या मध्यरात्री घडला. पोलिसांनी याप्रकरणी बाळू बाबू पवार, अभि वाघमारे, विशाल उर्फ नकट्या पाटोळे, डुई त्याच्यासह आणखी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अंकित भैरू प्रसाद सैन यांनी तक्रार दिली आहे. मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळतेय.

Published on: May 26, 2023 03:30 PM