ITI विद्यार्थ्याने ‘My Last Location is Madgi Bridge’ स्टेस्टस ठेवून उचललं टोकाचं पाऊल
भंडारा जिल्ह्यात तुमसर येथील एका आयटीआय प्रशिक्षण संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याच्या सोशल मीडिया स्टेटसमुळे खळबळ उडाली आहे. आयटीआय परीक्षेत नापास झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज आहे.
‘माय लास्ट लोकेशन इज माडगी ब्रीज’ असं व्हॉट्सअॅपवर स्टेटस (WhatsApp Status) ठेवल्यामुळे विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचलल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आयटीआयच्या विद्यार्थ्याने आत्महत्या (ITI Student Suicide) केल्याची भीती व्यक्त केली जात आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे (Tumsar Bhandara) हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती आहे. परीक्षेच्या निकालात नापास झाल्यामुळे विद्यार्थ्याला नैराश्य आल्याचं बोललं जात आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच विद्यार्थ्याची शोध मोहीम हाती घेण्यात आली. विद्यार्थ्याने उल्लेख केलेल्या माडगी पुलावर सायकल आणि जॅकेट आढळले आहे, मात्र 48 तास गेल्यानंतरही विद्यार्थ्याचा शोध लागलेला नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्याने आत्महत्या केला, की आत्महत्येचा बनाव केला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र लेकाच्या काळजीने त्याच्या कुटुंबीयांना हुरहूर लागून राहिली आहे.
काय आहे प्रकरण?
भंडारा जिल्ह्यात तुमसर येथील एका आयटीआय प्रशिक्षण संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याच्या सोशल मीडिया स्टेटसमुळे खळबळ उडाली आहे. आयटीआय परीक्षेत नापास झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. माडगी येथील वैनगंगा नदीच्या पुलावरुन नदी पात्रातील पाण्यात उडी घेत त्याने आत्महत्या केल्याची भीती व्यक्त केली जात आहे. “माय लास्ट लोकेशन इज माडगी ब्रीज’ असं स्टेस्टस त्याने ठेवलं होतं. 20 वर्षीय विद्यार्थी शहरातील तुमसर वॉर्डमध्ये राहतो.