बाळासाहेबांनी दिलेलं बाळकडू कधीच विसरणार नाही, ShivSena वर्धापनदिनी Chandrakant Khaire यांची भावना
भाजप नेते निलेश राणे आणि नितेश राणेंकडून शिवसेनेला सातत्याने डिवचण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी समाचार घेतला आहे. निलेश आणि नितेश राणे हे काहीही करू शकत नाहीत. ते नुसतेच बोलतात. आपण कोणामुळे मोठे झालोत हे त्यांनी विसरू नये, अशा शब्दात चंद्रकांत खैरे यांनी राणे बंधूंना फटकारले आहे.

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी संवाद साधला. ऐन निवडणुकीच्यावेळी नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले. त्यावेळी आम्ही निलेश राणेंना दम भरला होता. सरकारी गाडी घेऊन ते फिरत होते. त्यांच्या विरोधात केसही टाकली होती. त्यांना माहीतच असेल, असं सांगतानाच आपण कोणामुळे मोठे झालो हे ते विसरले असतील. बाळासाहेबांमुळे तुमचे वडील मोठे झाले. काहीही बोलू नका आणि उपकार विसरू नका, असा सल्लाही खैरे यांनी दिला.