कोल्हापूर: ज्योतिबा डोंगराकडे जाणारा मुख्य रस्ता पुन्हा खचला
कोल्हापूरमध्ये ज्योतिबा डोंगराकडे जाणारा मुख्य रस्ता पुन्हा खचला आहे. केरली मार्गे ज्योतिबा मंदिराकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे.
कोल्हापूरमध्ये ज्योतिबा डोंगराकडे जाणारा मुख्य रस्ता पुन्हा खचला आहे. केरली मार्गे ज्योतिबा मंदिराकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. आता ही वाहतूक गायमुखमार्गे वळवण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांत ज्योतिबा डोंगराकडे जाणारा हा मुख्य रस्ता तीन वेळा खचला आहे. रस्ता खचल्याने मंदिराकडे जाणारी वाहतूक ही दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. केरली मार्ग हा 2019 च्या पावसाळ्यात 250 मीटर खचला होता. 2020 मध्ये नव्याने दुरुस्त केलेला रस्ताही दुसऱ्यांदा खचला होता. खचलेल्या रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी रुपयांचा खर्च झाला होता. गेल्यावर्षी पावसाळ्यात तज्ज्ञांनी रस्त्याला भेट देऊन अभ्यास केला होता. त्यानुसार तातडीने कामही सुरु झालं होतं. मात्र अतिवृष्टीमुळे तो नवीन रस्ताही खचला.
Published on: Jul 08, 2022 01:34 PM