संत तुकाराम आणि शिवरायांची भेट! ऐतिहासिक देखावा
हा शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांच्या भेटीचा ऐतिहासिक देखावा आहे. इगतपुरीतील (Igatpuri) या देखाव्याची बरीच चर्चा आहे.
इगतपुरी: गणपती उत्सव (Ganesh Festival) मोठ्या उत्सवात साजरा केला जातोय. कोरोना काळात लोकांना सगळ्यात जास्त उणीव भासली असेल तर ती आहे सणांची. भारतात सणवाराला जास्त महत्त्व आहे. कोरोना काळात याचीच कमतरता होती. सार्वजनिक उत्सवांवर बंदी होती. पण यावर्षी मात्र गणपती मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. गणपती बाप्पाचं आगमन घरोघरी झालंय. घरात बसविले जाणारे बाप्पासुद्धा त्यांचा थाट मंडळाच्या गणपतींपेक्षा कमी नसतो. नाशकातल्या कुंडगर परिवाराने एक ऐतिहासिक (Historical) देखावा साकारलाय. हा शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांच्या भेटीचा ऐतिहासिक देखावा आहे. इगतपुरीतील (Igatpuri) या देखाव्याची बरीच चर्चा आहे. हा देखावा जिवंतपणा मुळे आकर्षक वाटतो. देखावा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतायत.