‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’चे झळकले पोस्टर्स, कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी; अजित पवार यांची कुठंय हवा?
VIDEO | 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' अशा आशयाचे शहरात पोस्टर्स, कुठं केली अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी?
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. या दरम्यानच पुण्यातील कोथरूड परिसरात अजित पवार यांचीच हवा असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील कोथरूड या भागात ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ या आशयाचे बॅनर झळकल्याचे पाहायला मिळत आहे. तर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांकडून ही जोरदार बॅनरबाजी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तर एका मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी जाहीरपणे मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असे म्हटले होते. गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार हे भाजपच्या वाटेवर आहेत आणि जर ते भाजप सोबत गेले तर ते मुख्यमंत्री होणार अशा चर्चांना चांगलंच उधाण आल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र या सर्व चर्चांवर अजित पवार यांनी स्वतः पूर्णविराम दिल्याचे पाहायला मिळालं होतं. मात्र आता पुन्हा ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ या पोस्टर्सवरून चर्चा रंगताना दिसू लागली आहे.