बाप…पक्ष…निकाल अन् बहुमत, आयोगाच्या निकालानंतर दोन्ही पवार गटात वॉर
राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह आणि नावासह आयोगानं हा पक्ष अजित पवार गटाकडे सुपूर्द करताना बहुमत हा निकत निवडणूक आयोगानं लावला. यानिकालाविरोधात आता शरद पवार यांचा गट सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे..
मुंबई, ८ फेब्रुवारी २०२४ : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर दोन्ही गटामध्ये वॉर सुरू झालाय. कुठे घोषणाबाजी झाली तर कुठं जल्लोष. राष्ट्रवादीची मालकी अजित पवार यांना मिळाल्यानंतर शरद पवार यांचा गट आक्रमक झालाय. अनेक शहरात अजित पवारांविरोधात घोषणाबाजी झाली. पोस्टर, बॅनर फाडत विविध घोषणा दिल्यात. तर दुसरीकडे लोकशाहीचा विजय म्हणत अजित पवार गटाने तुफान जल्लोष केला. १९९९ साली शरद पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी पक्ष २५ वर्षांनंतर २०२४ ला अजित पवार यांच्याकडे आलाय. राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह आणि नावासह आयोगानं हा पक्ष अजित पवार गटाकडे सुपूर्द करताना बहुमत हा निकत निवडणूक आयोगानं लावला. यानिकालाविरोधात आता शरद पवार यांचा गट सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…
Published on: Feb 08, 2024 10:59 AM