शिवसैनिक पेटले! बंडखोर नेत्याच्या कार्यालयाची तोडफोड
काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये झालेल्या आंदोलनात शिवसैनिक महिला पदाधिकारी अक्षरशः रडताना दिसून आल्या होत्या. आज अशीच एक शिवसैनिकांची आंदोलनाची बातमी समोर येतीये.
पुणे: गेल्या काही दिवसात राजकारणात भूकंपावर भूकंप चालू आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातले शिवसैनिक चांगलेच तापलेत. ठिकठिकाणी आंदोलनं, मोर्चे काढले जातायत. काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये झालेल्या आंदोलनात शिवसैनिक महिला पदाधिकारी अक्षरशः रडताना दिसून आल्या होत्या. आज अशीच एक शिवसैनिकांची आंदोलनाची बातमी समोर येतीये. पुण्यात तानाजी सावंत (Tanaji Sawant Pune) यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलीये. पुण्यात शिवसैनिक आक्रमक झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर तानाजी सावंत हेदेखील त्यांच्यासोबत बंड करून आसामला गेले. त्यानंतर आता राज्यभरातील शिवसैनिक (Shivsainik) आक्रमक झाले आहेत. त्यांनी बालाजीनगर (Balaji Nagar Pune) परिसरातील तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलीये.